close
BERJAYA
BERJAYA
BERJAYA
BERJAYA
BERJAYA
BERJAYA

BERJAYA

मराठी ग्रंथ संग्रहालय इतिहास

मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे ही संस्था 1 जून 1893 रोजी स्थापन झाली. शतकोत्तर परंपरा लाभलेल्या या संस्थेचे, मराठी ग्रंथांचे, भाषेचे संवर्धन व जतन करणे हे प्रमुख उद्दिष्ट व ध्येय आहे. अशा या संस्थेच्या दोन नवीन इमारती,सुभाष पथ येथे पाच मजली,तर नौपाडा येथे चार मजली बांधून पूर्ण झाल्या आहेत.

उक्त वास्तूंचे उदघाटन विद्यावाचस्पति श्री. शंकर अभ्यंकर यांच्या शुभ हस्ते शनिवार दि. 2 जानेवारी 2010 रोजी संपन्न झाले. ज्येष्ठ साहित्यिक प्रा. श्री. शंकर वैद्य या प्रसंगी अध्यक्ष म्हणून उपस्थित होते.

अधिक वाचा

 

BERJAYA

भावे, विनायक लक्ष्मण : (१८७१—१२ सप्टेंबर १९२६)

ठाणे शहरातील साहित्यिक चळवळीचा पाया वि. ल. भावे यांनी १ जून १८९३ रोजी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना करून घातला. १८७८ च्या पहिल्या मराठी ग्रंथकार संमेलनामुळे उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती करणे, ग्रंथ संग्रहाची आवड लोकात निर्माण करणे आणि साहित्य विषयक चर्चा घडवून लोकांमध्ये साहित्याभिरुची आणि मराठी भाषाप्रेम वाढीस लावणे हे कार्य होणे आवश्यक आहे. याची तीव्र जाणीव तत्कालीन सुशिक्षितांमध्ये निर्माण झाली होती. अशा समाजधुरीणांत ठाण्यातील वि. ल. भावे हे होते. आपली मराठी भाषा सुधारण्याचे अनेकांनी प्रयत्न केले. कोणी नवीन ग्रंथ रचना केली, कोणी परकीय भाषेतील ग्रंथांची भाषांतरे केली तर कोणी जुने ग्रंथ मिळवून ते प्रसिद्ध केले. परंतु हे ग्रंथ एकत्र करण्याचा प्रयत्न नीटपणे कोणी फारसा केला नाही. तत्कालीन ग्रंथ संग्रहालयात बहुतांशी इंग्रजी ग्रंथ खरेदी केले जात. त्यामुळे मराठी ग्रंथ संग्रहित होत नसत. ही उणीव दूर करण्यासाठी ठाणे येथे त्यांनी मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली.

अधिक वाचा

 

BERJAYA
BERJAYA

वृत्तप्रतांनी घेतलेली दाखल

अधिक वाचा
BERJAYA
BERJAYA
BERJAYA
BERJAYA

आगामी कार्यक्रम

अधिक वाचा
Top