close
Skip to main content

Posts

भावतो तुझा रंग सावळा!

निळ तलमाची काठ नक्षी, नयनाला लागला लळा! कौतुक नाही ही भावना माझी, भावतो तुझा रंग सावळा! पदर रुंद कमेरचा तुझ्या नभाला भिडतो केवढा! मनात माझ्या स्फुरली कस्तुरी, होऊ दे तिचा केवडा! प्रेम करतो तुझ्यावर हा निधड्या छातीचा मावळा! कौतुक नाही ही भावना माझी, भावतो तुझा रंग सावळा! कळी कोवळी ओठांची, दे रंग लाललाल त्यातला! श्वास गंधाळतो अत्तर, चुकवते ठोका हृदयाच्या आतला! किती अशी स्वच्छंदी सखी! फुलवते प्रणयाचा मळा! कौतुक नाही ही भावना माझी, भावतो तुझा रंग सावळा! उभारलेले तनाचे पोत तुझे, देतात माझ्या मनाला साद! पायातले पैंजण तुझे, घालतात माझ्या अंगणी नाद! भरजरी पैठणी शोभते तुला, रंग तिचा गडद पिवळा! कौतुक नाही ही भावना माझी, भावतो तुझा रंग सावळा! मदनाची वारुणी तुझी, झिंग घालते माझ्या जीवना! असावी तू अबदकाळी, हीच माझ्या मनाची भावना! मिठीत घेता तुला, वाहतो स्नेहाचा ओढा खळाखळा! कौतुक नाही ही भावना माझी, भावतो तुझा रंग सावळा!  ~ प्रतिक 
Recent posts

ती आणि तो | पर्व ३ | भाग १ - मतभेद

"तू अति विचार करतोय असं नाही का वाटत तुला?", ती रागावून म्हणाली.  "अति विचार, वाह्ह छान म्हणजे आता मी क्षणात बसायचं काहीच बोलायचं नाही, कारण बोललो म्हणजे मी अति विचार करतोय असं म्हणणार तू", तो ही आवाज चढवत म्हणाला.  "मागच्या दोन आठवड्यापासून हेच चालू आहे नुसतं तुझं," तिचा स्वर वरती सरकला.  "अग मग तुला हे कळायला हवं ना! जर माणूस १५ दिवसापासून एखादी गोष्ट सांगतो आहे म्हणजे तो काही ना काही विचार करत असणार, त्याची बाजू ऐकून तर घे, पण नाही प्रेमात बोलणारच नाही ना आपण, राग तर लगेच येतो सेकंदामध्ये",  त्याला हे उत्तर देणं भाग होत.  "हेच हेच, हे टोमणे सततचे, तुला जे हवय ते माझ्याकडून होणार नाही हे आदी सांगितलं आहे मी तुला मग का हट्ट करतोस", तीसुद्धा तिच्या मतांवर ठाम होतीच.  मागच्या १५ दिवसांपासून त्यांच्यामध्ये हा वाद सुरु होता, तिच्या कामामुळे तिला पुरेसा वेळ देता येत नव्हता आणि याउलट त्याचा कामाव्यतिरिक्तचा वेळ त्याला तिच्यासोबत रमवायचा होता पण काही केल्या ते गणित काही बसत नव्हतं म्हणून हे भांडण.  "हे बघ मला ठाऊक आहे तुला काम आहे आणि आप...

काल पुन्हा एकदा वाचल्या, तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता!

  काल पुन्हा एकदा वाचल्या, तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता! माहिती नाही कितव्यांदा! तुला पुन्हा पून्हा वाचतांना मला तू पुन्हा पून्हा उमगतेस, तुझ्या प्रत्येक पानाला उलगडून वाचतो मी, तुझ्या ओठांवर लिहिलेल्या चारोळ्या, तुझ्या लाजण्यावर लिहिलेल्या गजला, गुणगुणत असतो मी... तुझ्या हसण्यातल्या वृत्तबद्ध कविता, तुझ्या स्वप्नांसाठी रचलेल्या त्रिवेण्या, तरळत असता माझ्या मनी... प्रत्येक ओळीत नवीनच असतेस तू तुझ्या आभास तुझ्या स्पर्श वसलेला असतो त्या कागदांवर... रोज संध्याकाळ होते आणि तुझ्या आठवणींत मी रमतो, आणि म्हणून... काल पुन्हा एकदा वाचल्या, तुझ्यासाठी लिहिलेल्या कविता! माहिती नाही कितव्यांदा!

कुछ ५० ६० खत, मेरी ग़ज़लों की डायरी

कुछ ५० ६० खत, मेरी ग़ज़लों की डायरी गुलजार की नज़्मों की किताब और तुम्हारा काला दुप्पट्टा, सबकुछ है यहाँ, बस तुम नहीं हो हम साथ गुजारी हुई रातें-दिन संजोए है मैंने तुम्हारे इंतज़ार में, इंतज़ार शायद, ज़िन्दगी भर का? या शायद अगली ज़िन्दगी का भी! देखो अभीतक उबल रही है तुम्हारे लिए आंचपर रखी हुई अदरक और दो चम्मच चिनीवाली चाय, चाय तो मैं पि लूंगा पर उसके साथ होनेवाली हमारी गुफ्तगू कहाँ से लाऊ मैं? उस दिन तुम्हे बैचैन देखा था, जब तुम्हारा पसंदीदा झुमका खो गया! देखो दो झुमके लाये थे मैंने तुम्हारे लिए, अब किसी पहनाउँगा ये मैं? बेहरहाल, मैं ठीक हूँ, क्या कर रहा हूँ पता नहीं, क्या होनेवाला है पता नहीं? जब भी अपने कमरे में जाता हूँ तो, कुछ ५० ६० खत, मेरी ग़ज़लों की डायरी गुलजार की नज़्मों की किताब और तुम्हारा काला दुप्पट्टा, सबकुछ है यहाँ, बस तुम नहीं हो ~ प्रतिक

माझं शेवटचं पत्र असेल तुला

कदाचित हे माझं शेवटचं पत्र असेल तुला, आणि हे सुद्धा तसंच अनुत्तरित पडून राहणार, कदाचित तू हे वाचणार ही नाहीस, आणि नेहमी प्रमाणे तसंच जाईल हे रद्दीच्या गठ्यात...  उदाहरण म्हणून मी पुन्हा समजावेल स्वतःला कि, नाही आता ती आपुलकीची नाळ आपल्यात! नाही कोणताही संवाद, नाही जाणीव सोबतच्या क्षणांची..  पुन्हा जातील राती फक्त तुला फोटोत पाहण्यात, तुझ्याशी मौनात बोलण्यात, पुन्हा तुझ्यासाठी एखादी कविता लिहिण्यात..  आणि परत तेच होणार, हे सगळं सांगण्यासाठी तुला मी पत्र लिहिणार, आणि  कदाचित ते माझं शेवटचं पत्र असेल तुला, आणि ते सुद्धा तसंच अनुत्तरित पडून राहणार नेहमीसारखंच!
BERJAYA

Just in case | season 2 | EP: 1 - बंदर आणि गलबत

"अच्छा तसं, हे मला कळालं होतचं!  जेव्हा तू साखळ्या सोडायला सुरवात केलीस तेव्हाच!  कळतं नकळतं का होय ना, अंदाज लागलाच होता.  काय आहे ना, गलबतं जेव्हा प्रवासाला निघतं तेव्हा त्याची परिकल्पना बंदराला असतेच.  मग ते गल्बताच्या पुढे जाण्याच्या अपेक्षा रोखतं नाही,  तो बंदाराचा गुणधर्मच नाही.  कदाचित बंदर नेहमी ह्याच परिभाषेत जगतं असतं कि  त्याचं सगळ्यात आवडतीचं गलबतंसुद्धा एके दिवशी प्रवासाला निघून जाईल आणि बंदर स्वतः तेव्हा काहीच करू शकणार नाही." "बघ ना, म्हणजे-किती कुतुहलासारख आहे हे!  एके दिवशी एक अनोळखी गलबतं बंदरात येतं,  इथे रमतं, इथल्या गोष्टींसोबत जुळवून घेतं.  बंदाराशी त्यांची आपुलकी होते, विश्वास भेटतो, प्रेमभाव जुळतो.  या सगळ्यामध्ये क्षणार्धासाठी बंदर हे विसरून जातं कि गल्बताला पुढे प्रवास आहे.  इथे गलबताच्या काही जखमा बऱ्या होतात, मलमपट्टी होते,  तेही स्न्हेभावी बंदराचा मनमुराद आनंद घेतं.  अचानक प्रवासाची चाहूल लागते, गलबत लोगोलाग तयारीला लागतं, साखळ्या सुटायला लागता,  मोटारी चालू होतात आणि बंदर मागे पडू ला...
BERJAYA

Just in case | season 1

Just in case | season 1  "जस्ट इन केस", तुला वाटतं असेल की  तू सोडून गेल्यावर माझ्या उभ्या आयुष्याची राखरांगोळी होईल तर तसं काही नाही! तू येण्याआधी सुद्धा गाडी सुरळीतचं होती अगदी मजेशीर! नंतर फक्त इंजिनाला एक नवीन डबा "ऍड" झाला, बाकी इंजिनाच धावणं कुठं थांबलयं! आणि मी काही रडणार वैगरे नाही,  बस झालं ते जुनं पुराणं नाटकं, शतकानुशतके रडण्यातचं घालवलीत आम्ही! काही तरी "पॉसिटीव्ह व्हेरिअशन" हवं आता! नाही, लग्न, प्रपंच, संसार लेकरं बाळ माझेही होणार तुझेही होतील, ते काही सांगायची गरज नाही! उगाच आपलं वळणांवर थांबून वाट पाहण्यात काय अर्थ आहे? वाटा मोठ्या मोठ्या आहेत, नाही ह्या तर पुढच्या वाटेवर वाटसरू भेटलच की, मग प्रत्येक भेटलेला वाटसरू शेवटापर्यंत राहीलच याची आसक्ती का?  त्याला कोणती वेगळी वाट दिसली तो वळला म्हणून आपला प्रवास थांबायला नको ना, बरोबर की नाही! बरं, तू कॉफी घेशील की चहा टाकू? अच्छा, ठीक आहे ना मग! मला त्यात काही प्रॉब्लेम नाही, उगाच परतफेडीचा निरोप कशाला मग,  आल्याच आत्ता वेळ साधून घे! नाही! वाटल्यासं आत्ताच सगळे गणितं मांडून जा, परत येणं, जाणं कशाल...