रवी पंडित
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| दिलेले नाव | Ravi |
| आडनाव | Pandit |
| जन्मस्थान | पुणे |
| मृत्यू तारीख | ८ मे 2026 |
| मृत्यूस्थान | पुणे, महाराष्ट्र |
| बोलण्याची वा लेखनाची भाषा | इंग्लिश भाषा |
| व्यवसाय | व्यावसायीक व्यक्ती |
| शिक्षण घेतलेली संस्था | एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट |
| धर्म | हिंदू धर्म |
रवी पंडित (मूळ नाव: शशी शेखर बाळकृष्ण पंडित)[१] हे एक भारतीय उद्योगपती आणि 'केपीआयटी टेक्नॉलॉजीज' चे सह-संस्थापक आणि अध्यक्ष होते.[२][३]
केपीआयटी टेक्नॉलॉजीज
[संपादन]केपीआयटी टेक्नॉलॉजीज (कीर्तने अँड पंडित इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीस)[४] ही एक भारतीय बहुराष्ट्रीय कंपनी आहे जी मोटार वाहन उद्योग (ऑटोमोटिव्ह) कंपन्यांना अभियांत्रिकी संशोधन आणि विकास (ER&D) सेवा प्रदान करते. कंपनीचे मुख्यालय पुणे येथे असून भारताव्यतिरिक्त युरोप, अमेरिका, ब्राझील, जपान आणि चीनमध्ये त्यांची विकास केंद्रे आहेत.[५][६]
KPIT ने ५८ पेटंट दाखल केले आहेत,[७] काही शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि नाविन्यपूर्ण संशोधनासाठी अनेक पुरस्कार जिंकले आहेत.[८][९]
प्रारंभिक आयुष्य आणि कारकीर्द
[संपादन]पंडित यांचा जन्म भारतातील महाराष्ट्र राज्यातील पुण्यातील एका श्रीमंत मराठी कुटुंबात झाला. पंडित यांनी एमआयटी स्लोन स्कूल ऑफ मॅनेजमेंट मधून व्यवस्थापन विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. ते भारतीय सनदी लेखाकार संस्थान चे फेलो सदस्य आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया चे सहयोगी सदस्य होते. त्यांनी २००४ ते २००६ या काळात मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर चे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.[१०][११][१२] पंडित यांनी पुण्यातील 'शून्य कचरा प्रकल्पा'ला चालना दिली, ज्यासाठी त्यांनी जनवाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे महानगरपालिकेशी भागीदारी केली; या फाउंडेशनमध्ये त्यांनी विश्वस्त मंडळाचे सदस्य म्हणून काम पाहिले.[१३]
पंडित यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी अल्पश आजाराने निधन झाले.[१४]
प्रकाशने
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ↑ "Ravi Pandit Wrote His Obituary at MIT, Then Spent a Lifetime Proving It Right". autocarpro.in. १० मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "We see budgets happening in the area of digital technologies: Ravi Pandit, KPIT Technologies". The Economic Times. 27 April 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Long-term Wealth Creation Calls For Long-term Investments: Ravi Pandit". Forbes India (इंग्रजी भाषेत).
- ↑ "KPIT Salary for Freshers". १० मे २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Contact Us". KPIT Technologies. 29 April 2019 रोजी पाहिले.
- ↑ "KPIT Q3FY20 Profit grows 19.3% sequentially". KPIT Technologies. 29 Jan 2020. 29 Jan 2020 रोजी पाहिले.
- ↑ "Kishor Patil, CEO of KPIT Technologies". ComputerWorld India. 9 October 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Awards and Recognition". KPIT Technologies. 9 October 2017 रोजी पाहिले.
- ↑ "2016-1017 Annual Report | Technology Innovation at the Confluence of Engineering & Digital" (PDF). KPIT Technologies. p. 14. 14 December 2018 रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. 9 October 2017 रोजी पाहिले.
- ↑ "Annual Report" (PDF). Bombay Stock Exchange (इंग्रजी भाषेत). 2018–2019. Aug 5, 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 18 August 2023 रोजी पाहिले.
- ↑ India ... IT & Telecom Directory: A Comprehensive Guide on Information Technology. Amelia Publications. 2005. p. 657.
- ↑ "People: Finolex Cables Ltd (FNXC.NS)". Reuters. 13 February 2020 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ↑ "Formal launch of the 'Zero Garbage Project' in Pune's 'Prabhag 11'". The Times of India. 17 May 2015 रोजी पाहिले.
- ↑ "KPIT Technologies co-founder and chairman Ravi Pandit dies at 75". thehindubusinessline.com.
- ↑ "Leapfrogging to Pole-vaulting book launched in Pune". Hindustan Times. 7 February 2019 रोजी पाहिले.
- ↑ "Leapfrogging to Pole-vaulting:Creating the Magic of Radical Yet Sustainable Transformation". Penguin India.
